SSD vs HDD in marathi,

SSD म्हणजे काय? SSD की HDD नक्की कोणते आहे फायदेशीर? तसेच SSD आणि HDD मध्ये काय फरक आहे? ते आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

नवीन लॅपटॉप व कॉम्प्युटर घेताना आपल्यासमोर दोन पर्याय उपलब्ध होतात. Hard Disk Drive (HDD) आणि Solid State Drive (SSD). हे दोन्ही ऑपरेटिंग सिस्टम आहेत तसेच हे डेटा साठवून ठेवण्यासाठी वापरले जातात. पूर्वीच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर मध्ये HDD स्टोरेज वापरले जायचे. पण HDD मुळे लॅपटॉप व इंटरनेट चा वेग व जागेवर फरक पडायचा. पण आजच्या नव्या तंत्रज्ञानाच्या युगात लॅपटॉप व कॉम्प्युटर मध्ये एक नव्या प्रकारचा वापर केला जातो. त्या प्रकाराचे नाव आहे SSD स्टोरेज. SSD हा एक नवा स्टोरेज चा प्रकार आहे. जो डेटा स्टोअर करण्यासाठी वापरण्यात येतो. SSD चा फुल फॉर्म सॉलिड स्टेट ड्राईव्ह (Solid State Drive) असा आहे. आजच्या लेखात आपण SSD की HDD स्टोरेज नक्की कोणते आहे फायदेशीर? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.. चला तर जाणून घेऊया..


HDD म्हणजे काय?


HDD म्हणजे Hard Disk Drive. HDD चा वापर डेटा स्टोअर करण्यासाठी करण्यात येतो. HDD स्टोरेज लॅपटॉप व कॉम्प्युटर मध्ये वापरण्यात येते. HDD चा शोध 1956 साली झाला होता. हार्ड डिस्क मध्ये फिरते भाग असतात. डेटा रीड आणि राईट (Data Read & Write) करण्यासाठी हार्ड डिस्क मध्ये हे फिरते भाग असतात.
HDD मध्ये तुम्हाला खूप जास्त जागा (Storage) मिळते. बाजारात जास्तीत जास्त लॅपटॉप मध्ये 1TB पर्यंत HDD स्टोरेज उपलब्ध असते. HDD आणि SSD दोन्ही दिसायला तसे सारखेच असतात




_____________________________________________________________________

SSD म्हणजे काय?


SSD एक स्टोरेज ड्राईव्ह आहे. SSD हे HDD पेक्षा खूप जलद आहे.SSD मध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. SSD मध्ये फिरते भाग नसतात तर त्यामध्ये फ्लॅश मेमरीचा वापर करण्यात येतो. एसएसडी मधील भाग हे बोर्डवर बसवलेले असतात. अधिक जाणून घेण्यासाठी खालील फोटो पाहू शकता..
SSD ही HDD पेक्षा खूप वेगाने काम करते. ज्यामुळे ऍप्लिकेशन, फोटोज् व फाईल्स एका सेकंदात चालू होतात. SSD जलद व वेगाने काम करत असली तरी त्याचे स्टोरेज HDD पेक्षा कमी असते.



Comments